महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( Maharashtra Public Service Commission ) मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना(MPSC Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. एकूण 81 जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2022 (11:59 PM) पर्यंत राहणार आहे. एकूण जागा : ८१ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) उपसंचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ 01 शैक्षणिक पात्रता : (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 10 वर्षे अनुभव. 2) सहायक संचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ 05 शैक्षणिक पात्रता : (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मु...